Special Report | निवडणुकीचा धुरळा

Special Report | निवडणुकीचा धुरळा

| Updated on: Jan 22, 2022 | 12:01 AM

उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) हे निवडणूक लढवणार आहेत. गोरखपूर मतदारसंघातून ते योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा सामना करतील.

उत्तर प्रदेश – युपीच्या (UP) राजकारणात रोज नवे राजकीय बॉम्ब फुटत असल्याचे आपण पाहतोय, त्यामध्ये भाजपच्या (BJP) आमदारांचं बंड, समाजवादी पक्षाच्या नेत्यांचं भाजप प्रवेश अशा अनेक गोष्टींनी युपीतलं राजकारण तापलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा (PRIYANKA GANDI VADRA) यांनी सकाळी एक राजकीय बॉम्ब फोडला असून त्याची देशात चर्चा सुरू आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असं विचारल्यानंतर त्यांनी मीच तर सगळीकडे दिसतेय ! असं वक्तव्य केल्यानं राजकारणाची चर्चा संपुर्ण देशभर सुरू आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Assembly elections 2022) दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहेत. या राज्यातून ताजी बातमी म्हणजे उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) हे निवडणूक लढवणार आहेत. गोरखपूर मतदारसंघातून ते योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा सामना करतील. चंद्रशेखर आझाद यांच्या पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पार्टीसोबत युतीची चर्चा अपयशी ठरल्यानंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे.

Published on: Jan 21, 2022 11:59 PM
Special Report | देशात काय घडतंय ?
Special Report | ST चा गाडा खासगीकरणाकडे?