राज्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार की नाही? ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं…

| Updated on: Jul 13, 2024 | 3:58 PM

शिंदे समितीने हैदराबाद मधील निजाम नोंदीची तपासणी केली असली तरी त्याआधारे राज्यात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्टपणे बबनराव तायवाडे यांनी म्हटले. राज्यात ओबीसीमध्ये असलेल्या अनेक जाती इतर राज्यात इतर प्रवर्गात आहेत. तर दुसऱ्या राज्यात सापडलेली नोंद आपल्या राज्यात ग्राह्य धरणार?

हैदराबादमध्ये निजाम नोंदी सापडल्या तरी त्यांना राज्यात कुणबी प्रमाणपत्र सरकार देऊ शकणार नाही, असा दावा राष्ट्रीय OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केला आहे. शिंदे समितीने हैदराबाद मधील निजाम नोंदीची तपासणी केली असली तरी त्याआधारे राज्यात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्टपणे बबनराव तायवाडे यांनी म्हटले. राज्यात ओबीसीमध्ये असलेल्या अनेक जाती इतर राज्यात इतर प्रवर्गात आहेत. तर दुसऱ्या राज्यात सापडलेली नोंद आपल्या राज्यात ग्राह्य धरायची का, हे संविधान आणि न्यायालयात टिकेल का हा प्रश्न आहे, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. सरकारने असा प्रयत्न केल्यास त्याला न्यायालयात आवाहन देणार असल्याचे म्हणत मराठा आरक्षण हा ज्वलंत प्रश्न आहे. तर जरांगे पाटील यांचा दौरा सामाजिक राजकीय नसल्याने सामाजिक प्रश्न म्हणून त्यांना प्रतिसाद मिळतोय, हा प्रतिसाद जारांगेला राजकीय क्षेत्रात मिळणार नाही, असे तायवाडे म्हणाले.

Published on: Jul 13, 2024 03:58 PM
Mumbai Local Train : अरे भाई ये क्या है… मुंबईची लाईफ-लाईन लिकेज, लोकलच्या डब्यातून पावसाच्या धारा, ही ट्रेन तुमची तर नाही ना?
‘राऊतच्या डोक्यावर परिणाम, तो पागल माणूस’; ‘त्या’ आरोपांवर एकेरी उल्लेख करत शिरसाटांचा पलटवार