सत्ताधारी असो वा विरोधक, वेशीवर लागले नेत्यांच्या बंदीचे फलक

| Updated on: Oct 29, 2023 | 7:41 AM

tv9 Marathi Special Report | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण देण्यात येत नसल्याने अनेक गावांमध्ये प्रवेशबंदी झाल्यानं नेत्यांची कोंडी झाली आहे. बंदीनंतरही जर एखाद्या नेत्यानं प्रवेश केला तर आंदोलक प्रश्नांची सरबत्ती करतायत

मुंबई, २९ ऑक्टोबर २०२३ | अनेक गावांमध्ये प्रवेशबंदी झाल्यानं नेत्यांची कोंडी झाली आहे. बंदीनंतरही जर एखाद्या नेत्यानं प्रवेश केला तर त्यांच्या वाहनांचा ताफा रोखून आंदोलक प्रश्नांची सरबत्ती करतायत आणि भूमिका मांडा नाहीतर माघारी फिरा म्हणून भूमिका घेत आहेत. शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर लातूरच्या विश्रामगृहावर होते. बंदी असल्यामुळे तिथंही मराठा आंदोलक पोहोचले आणि त्यांनी तुपकरांनाही जाब विचारला. तर परभणीच्या पूर्णा तालुक्यातील ताडकलस येथे मराठा बांधवांकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. याच ठिकाणी माजी आमदार, भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांचा ताफा अडवत बोर्डीकरांना गावात प्रवेश नाकारला होता. बंदी असूनही भाजपचे खासदार नांदेडच्या अंबुलगा गावात आले. गावकऱ्यांना हे समजताच आधी त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या फोडल्या. नंतर ज्यांच्या घरी खासदार चिखलीकर आले होते. तिथं जमाव जमला. अखेर विरोधामुळे चिखलीकरांना गावातून बाहेर पडावं लागलं. बघा कुठंय नेत्यांना गावबंदी

Published on: Oct 29, 2023 07:41 AM
‘सहा बॉलमध्ये एखादा नो बॉल तसे…; शिंदे म्हणजे एका हत्तीची…’ बच्चू कडू नेमक काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेवरुन देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन बी काय?