मराठा आरक्षणाचा मुसदा EXCLUSIVE, ‘इतके’ टक्के मिळणार आरक्षण
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडून जे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्याबाबतचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाकडून तयार करण्यात आला आहे. या अहवालाचा मसुदा टीव्ही ९ मराठीकडे एक्सक्लुझिव्ह आला आहे.
मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १०आरक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडून जे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्याबाबतचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाकडून तयार करण्यात आला आहे. या अहवालाचा मसुदा टीव्ही ९ मराठीकडे एक्सक्लुझिव्ह आला आहे. सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक १… महाराष्ट्र राज्याच्या संबंधात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून विवक्षित समाज विनिर्दिष्ट करण्याकरिता आणि महाराष्ट्र राज्यातील अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या उन्नतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील व पदांवरीलनियुक्त्यांसाठी पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता विधेयक…