Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढणार? कुणी पाठवली कायदेशीर नोटीस?
VIDEO | राठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी समस्त मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. तात्काळ मराठा समाजाची माफी मागवी, अन्यथा कायदेशीर लढाईला सामोरे जावे, असा मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला इशारा.
मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३ | मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी समस्त मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणाच्या हक्कासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. अनेक मराठा बांधव यांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं असताना मराठा समाजाची चेष्टा करणारं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ हे करत आहेत. त्यांनी तात्काळ मराठा समाजाची माफी मागवी, अन्यथा कायदेशीर लढाईला सामोरे जावे, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे. मराठा समाजाबद्दल खोटे आणि अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल तसेच मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याप्रकऱणी सतीश काळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. याद्वारे भुजबळ यांना इशाराच दिला आहे.