मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ताफा औरंगाबादेत अडवणार, मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका
मुख्यमंत्री 17 ऑगस्टला औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा कोणत्याही परिस्थितीत अडवण्याचा निर्णय घेतल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा औरंगाबादमध्ये अडवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. मुख्यमंत्री 17 ऑगस्टला औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा कोणत्याही परिस्थितीत अडवण्याचा निर्णय घेतल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. खासदार संभाजीराचे छत्रपती यांना राज्य सरकारानं दिलेली आश्वासन पूर्ण केली नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून ही माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही झालं तरी ताफा अडवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.