Jalna Maratha Protest | आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची लाठीचार्जच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया, केली मोठी मागणी?

| Updated on: Sep 01, 2023 | 11:49 PM

VIDEO | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लाठीचार्जच्या घटनेवर Tv9 मराठीला EXCLUSIVE दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मराठा आरक्षण लवकरात लवकर लागू करावं', अशी केली मोठी मागणी

जालना, १ सप्टेंबर २०२३ | मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जालन्यातील अंतरवली सराटी गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून उपोषण सुरु होतं. दरम्यान, आज या ठिकाणी मराठा आंदोलकांवर आज जालन्यात लाठीचार्ज करण्यात आलं. या घटनेवर मनोज जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारला हा सर्वात मोठा डाग आहे. माझी माता माऊलीला गावात येवून मोघलाईने मारलं नाही, शिंदे साहेब सर्व मराठ्यांकडून अपेक्षा होत्या. खास मराठ्याचा माणूस आहे, पण तुम्ही आमच्या माता-माऊलींना मारुन गोळीबार करायला लावला, असे मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. तर आम्ही काय केलं की आमच्या माता माऊलींना तुम्ही घरात घुसून मारलं? आमच्यावर गोळीबार? आम्ही काय केलं? शांततेत मागणी केली की, आम्हाला आरक्षण द्या. उपोषण केलं. शिंदे साहेब तुम्हाला आणखी एकदा सांगतो, आम्ही काही केलेलं नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, ते मरेपर्यंत मी घेणारच, असं आव्हानच यावेळी त्यांनी दिलं.

Published on: Sep 01, 2023 11:49 PM
लोकसभेसोबतच राज्यांच्या निवडणुका घेण्यासाठी केंद्राच्या हालचाली, किती राज्यांच्या होणार निवडणुका?
Jet Airways चे संस्थापक नरेश गोयल यांना ED कडून अटक, इतक्या कोटींच्या फसवणुकीचा आरोप