Prashant Bamb : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक, भाजप आमदाराच्या कार्यालयाची केली तोडफोड
Maratha protest : मराठा समाजाच्या मागणीसाठी मराठा संघटना आता आक्रमक होत आहे. मराठा आंदोलकांकडून कित्येक गावात मंत्र्यांना प्रवेशबंदी तर कुठं रास्ता रोको करण्यात आलाय. तर छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर येथे मराठा आंदोलकांकडून प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची मोठी तोडफोड करण्यात आली
छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, ३० ऑक्टोबर २०२३ | मराठा समाजाच्या मागणीसाठी मराठा संघटना आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांकडून कित्येक गावात मंत्र्यांना आणि आमदारांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे तर कुठं रास्ता रोको करण्यात आलाय. तर छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर येथे मराठा आंदोलकांकडून प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची मोठी तोडफोड करण्यात आली आहे. प्रशांत बंब हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील भाजप आमदार आहेत. यावेळी मराठा आंदोलकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत एक मराठा लाख मराठा अशीही घोषणाबाजी केली. तर धाराशिव जिल्ह्यातील मेडसींगा या गावात मराठा तरुण आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशिवसमधील मेडसींगा या गावात जवळपास 20 उच्च शिक्षित मराठा तरुणांनी स्वतःला जमिनीत गाढून घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या मराठा तरुणांनी कंबरेपर्यंत स्वतःला जमिनीत गाडून घेतल्याचे पाहायला मिळाले.