मोठी बातमी! मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर; राहुल नार्वेकर यांच्याकडून घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यानंतर या प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. त्यानंतर एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळे मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळाल्याने आता मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक एकमताने विधानसभेत एकमताने संमत करण्यात आलंय. मराठा आरक्षणाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्यानंतर विधिमंडळात हे विधेयक मांडण्यात आले. विधानसभेतही मराठा आरक्षण विधेयकाचा मुसदा एकमताने मंजूर करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील तशी घोषणा केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यानंतर या प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. त्यानंतर एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळे मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळाल्याने आता मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं जाईल त्यानंतर ते राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येईल मग त्यासंदर्भातील कायद्यात रूपांतर करण्यात येणार आहे. मराठा समाजाचा, मराठा ऐक्याचा विजय आहे. मराठा समाज्या चिकाटीचा हा विजय आहे. मराठा लढयाचा विजय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.