Manoj Jarange उपोषण घेणार मागे? राज्य सरकारसमोर ठेवल्या ‘या’ ५ अटी

| Updated on: Sep 12, 2023 | 6:30 PM

VIDEO | मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घ्यावे म्हणून राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने तीनदा घेतली त्यांची भेट पण मनोज जरांगे यांची माघार नाही, तर आता सरकारपुढे ठेवल्या या अटी?

जालना, १२ सप्टेंबर २०२३ | गेल्या 15 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरूच ठेवले आहे. मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे म्हणून राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून त्यांची तीनदा भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्यात आली पण मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत जीआरही काढण्यात आला, यामध्ये असे म्हटले की, जुन्या कागदपत्रांमध्ये कुणबी वंशावळ असा उल्लेख असणाऱ्यांना मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्यात येईल, पण यावर जरांहे यांनी विरोध केला. तर ज्यांच्याकडे कुणबी वंशावळ अशा कागदपत्रांचे पुरावे नसतील त्यांनाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी जरांगे पाटील यांनी सरकारडे मागणी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून वेळ मागण्यात आला असून जरांगे पाटील यांनीही काही अटी राज्य सरकारपुढे ठेवल्या आहेत.

Published on: Sep 12, 2023 06:22 PM
KDMC मध्ये महापौर कोणाचा? यावरून भाजप, मनसे आणि शिंदे गटात जुंपली, बघा काय केला वार-पलटवार?
Amchya Pappani Ganpati Anala गाण्याच्या रीलचा धुमाकूळ, मात्र गायक प्रसिद्धीपासून दूर; कुणी गायलं गाणं?