मनोज जरांगे पाटील यांची बुलटेस्वारी, बाईक रॅलीसोबत अंतरवाली सराटीकडे रवाना

| Updated on: Feb 01, 2024 | 5:19 PM

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे बऱ्याच दिवसांनंतर जालन्यातील आपल्या अंतरवाली सराटी या गावात परतणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः बुलेट चालवत हे आपल्या गावी रवाना झाले आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक मराठा कार्यकर्ते देखील बाईक रॅलीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत होते

पुणे, १ फेब्रुवारी २०२४ : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे बऱ्याच दिवसांनंतर जालन्यातील आपल्या अंतरवाली सराटी या गावात परतणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः बुलेट चालवत हे आपल्या गावी रवाना झाले आहेत. तर यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक मराठा कार्यकर्ते देखील बाईक रॅलीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत होते. बऱ्याच दिवसांनंतर मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी गावात परत येत असल्याने गावकऱ्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारीही केल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षणासंदर्भातील कुणबी प्रमाणपत्रांची मागणी मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आपल्या घरी रवाना होताना दिसताय. मराठा आरक्षणावर ठाम असलेल्या आणि मराठा आरक्षणाच्या पहिल्या उपोषणापासून मनोज जरांगे पाटील यांनी आपलं घर आणि कुटुंब सोडलं होतं. तर जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत घरी परतणार नाही, असा निश्चय त्यांनी केला होता.

Published on: Feb 01, 2024 05:19 PM
जरांगे पाटलांचा अभ्यास बिल्कुल नाही, छगन भुजबळच नाही तर आता ‘या’ व्यक्तीनंही केलं चॅलेंज
…तर चोरबाजार मांडावा लागला नसता, ‘त्या’ अटीवरून उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना खोचक टोला