Maratha Reservation : … आता ऐकणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयानंतरही जरांगे पाटलाचा निर्धार कायम

| Updated on: Oct 31, 2023 | 12:11 PM

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : जालन्यातील अतंरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांचा निर्णय फेटाळून लावला. समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारून मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याचा निर्णय घ्या. अर्धवट आरक्षण घेणार नाही

जालना, ३१ ऑक्टोबर २०२३ | ज्या मराठ्यांकडे कुणबी जातीच्या नोंदी असतील त्यांना आजपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतला. या निर्णयाला फेटाळत मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली. दरम्यान, आज अतंरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांचा निर्णय फेटाळून लावला. जरांगे म्हणाले, नोंदीनुसार आरक्षण घ्यायला तयार नाही. समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट अधिवेश देण्याचा निर्णय घ्या. विशेष अधिवेशन बोलवा. अर्धवट आरक्षण घेणार नाही. ते तुम्ही देऊ नका. आम्ही आमच्या अभ्यासकांची बैठक बोलावली असून वकिलांशी चर्चा करणार आहोत. पुढे जरांहे असेही म्हणाले की, ओबीसीतील जाती मराठा आणि कुणबी एकच आहे. २००४ चा जीआर आहे तो दुरुस्त करा. कारण व्यवसायावर आधारीत जाती निर्माण झाल्यात. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. त्याच धर्तीवर आरक्षण द्या. अर्धवट आरक्षण नको, तुम्ही कितीही बहाणे सांगितलं तरी ऐकणार नाही. सरसकट प्रमाणपत्र द्या, अशी मागणी त्यांनी केली.

Published on: Oct 31, 2023 12:11 PM
Manoj Jarange Patil LIVE : जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस, तब्येत खालावली; कोणत्या मुद्द्यावर केलं भाष्य
विशेष अधिवेशन होणार? देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, पडद्यामागे सरकारच्या कोणत्या हालचाली?