Maratha Reservation | ‘वडिल म्हणतात, तुम्हाला महाराष्ट्राचा आशीर्वाद’ : SambhajiRaje Chhatrapati

Maratha Reservation | ‘वडिल म्हणतात, तुम्हाला महाराष्ट्राचा आशीर्वाद’ : SambhajiRaje Chhatrapati

| Updated on: Feb 28, 2022 | 8:57 PM

मराठा समाजाच्या (Maratha Reservation) मागण्यासाठी सुरू असलेले छत्रपती संभाजीराजेंचं उपोषण (Sambhajiraje Hunger Strike) मागे घेण्यात आलं आहे. मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आंदोलन स्थळी दाखल होत राजेंची भेट घेतली. त्यानंतर या नेत्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

मराठा समाजाच्या (Maratha Reservation) मागण्यासाठी सुरू असलेले छत्रपती संभाजीराजेंचं उपोषण (Sambhajiraje Hunger Strike) मागे घेण्यात आलं आहे. मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आंदोलन स्थळी दाखल होत राजेंची भेट घेतली. त्यानंतर या नेत्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू होते. आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या सगळ्या संघटनांचे यावेळी संभाजीराजेंनी आभार मानले आहे. मी फक्त कोल्हापूरपुरता मर्यादित नाही, मी महाराष्ट्र आणि देशाचा आहे. शिवाजी महाराजांचे विचार जगभर परले आहेत. माझी खासदारकी लोकांच्या विकासासाठी आहे. माझ्या खासदारकीवर टीका झाली. मी आरक्षणाचा मुद्दा संसदेत मांडला. त्यानंतर इतर खासदारांनीही पाठिंबा दिला. त्यांचे आभार मानतो. तसेच सर्व समाजातील लोकांचेही आभार मानतो, कारण इतर समाजातील लोकही आमच्या पाठीमागे ठाम उभे राहिले, अशी प्रतिक्रिया यावेळी राजेंनी दिली आहे.

Published on: Feb 28, 2022 08:40 PM
Maratha Reservation |’मला पाठिंबा देणाऱ्यांचा हा विजय’- SambhajiRaje Chhatrapati
Eknath Shinde | अण्णासाहेब पाटील महामंडळाला 100 कोटी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय