मराठा आंदोलकांचं बॅनर फाडलं अन् मारहाण केली, भाजपवर नेमका आरोप काय? जरांगे पाटील आक्रमक

| Updated on: Nov 13, 2023 | 11:49 AM

रूग्णलायातील डिस्चार्जनंतर त्यांना भेटणार्याची मोठी गर्दी झाल्याची पाहायला मिळाली. सरकारच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता नुकतंच त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. डिस्चार्ड दिल्यानंतर त्यांनी सरकारने दिलेल्या २४ डिसेंबरच्या आश्वसानाची आठवण करून दिली. दरम्यान, बाहेर पडल्यानंतर त्यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलंय. तर दुसरीकडे जालन्यातील एका गावात आंदोलकांच्या प्रवेश बंदीचं बॅनर फाडून मारहाणीचा प्रकार घडल्यानं नवीन वाद निर्माण झालाय. रूग्णलायातील डिस्चार्जनंतर त्यांना भेटणार्याची मोठी गर्दी झाल्याची पाहायला मिळाली. सरकारच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता नुकतंच त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. दोन दिवस ते गावात असणार आहे. मात्र तरी ते घराचा उंबरठा ओलांडणार नसल्याचे त्यांनी म्हटले. तर परभणीमध्ये रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनामुळे गाव सोडून परतावं लागलंय. बघा नेमकं काय घडलं?

Published on: Nov 13, 2023 11:46 AM
शरद पवार यांचा व्हायरल OBC दाखला खरा की खोटा? राष्ट्रवादीचं बोट भाजपकडे? बघा स्पेशल रिपोर्ट
एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल राहुल नार्वेकर यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा अर्थ काय?