आरक्षण वादात चर्चेतले ‘ते’ 3 जीआर नेमके काय? मराठा-कुणबी एकच आहेत की वेगवेगळे?

| Updated on: Jun 24, 2024 | 11:07 AM

आरक्षणाचा वाद पुन्हा मराठा-कुणबी मुद्द्यावर आला आहे. आरक्षणाच्या वादात चर्चेत राहिलेल्या तीन जीआरची पुन्हा चर्चा होताना दिसतेय. तर दुसरीकडे मराठा आणि कुणबी एकच आहेत की वेगवेगळे यावरूनही वाद-प्रतिवाद सुरू झालाय. चर्चेतले 'ते' 3 जीआर नेमके काय? बघा स्पेशल रिपोर्ट

Follow us on

आरक्षणाचा वाद पुन्हा मराठा-कुणबी मुद्द्यावर आला आहे. आरक्षणाच्या वादात चर्चेत राहिलेल्या तीन जीआरची पुन्हा चर्चा होताना दिसतेय. तर दुसरीकडे मराठा आणि कुणबी एकच आहेत की वेगवेगळे यावरूनही वाद-प्रतिवाद सुरू झालाय. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना प्रमाणपत्र द्यावचं लागेल असे लक्ष्मण हाके आणि पंकजा मुंडे म्हणताय. मात्र बोगस प्रमाणपत्र कोणालाही देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर या आधीच्या सरकारच्या कागदपत्रांवर कुणबी आणि मराठा एकच असल्याचं सरकारने म्हटलं होतं, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे जिथून गिरीश महाजन येतात त्या खान्देशात मराठा कुणबी समाज हा मराठा आहे. मात्र चर्चेवेळी मराठा आणि कुणबी वेगवेगळे असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले. तर कुणबी आणि मराठा या समाजाचे देव, सोयर रितीरिवाज वेगवेगळे असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला. आरक्षण वादात १९६७, १९९४ आणि २००४ या तीनही वर्षातील चर्चेतले ‘ते’ 3 जीआर नेमके काय? बघा स्पेशल रिपोर्ट