पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे ‘जीआर’ची होळी

| Updated on: Jun 18, 2024 | 4:15 PM

ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते गेल्या आठवड्याभरापासून उपोषणाला बसले आहेत. या उपोषणस्थळीच ओबीसी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून सगेसोयरे जीआरची होळी करण्यात आली आहे. तर सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अमंलबजावणी करू नका, अशी मागणी देखील ओबीसी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

Follow us on

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते गेल्या आठवड्याभरापासून उपोषणाला बसले आहेत. या उपोषणस्थळीच ओबीसी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून सगेसोयरे जीआरची होळी करण्यात आली आहे. तर सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अमंलबजावणी करू नका, या पद्धतीची मागणी पुण्यात ओबीसी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. ‘सगेसोयरे हा शब्दच आपल्या संविधानामध्ये नाही. सगेसोयरे हे नातं आपल्या वडिलांकडून आलेलं आहे. पण त्याचा जर मनोज जरांगे पाटील यांचा अभ्यासच नाही आणि ते सगेसोयरे हेच धरून बसले आहेत. सातत्याने आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांच्यापुढे राज्यसरकार झुकणार असेल तर मग सरकारला आणखी बरंच शिकण्याची गरज असेल. सरकारचा या संदर्भात आम्ही निषेध करतोय त्यासाठी आम्ही प्रतिकात्मक होळी केली आहे’, अशी भावना ओबीसी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.