वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक
खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 26 फेब्रुवारी रोजी संभाजी छत्रपती उपोषणाला आझाद मैदानात सुरुवात करणार आहेत.
खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 26 फेब्रुवारी रोजी संभाजी छत्रपती उपोषणाला आझाद मैदानात सुरुवात करणार आहेत. राज्य सरकारनं मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची बैठक सुरु झाली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील यांच्या सह समितीचे सदस्य बैठकीला उपस्थित आहेत. वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु झालीय.