शिंदे समितीकडून अहवाल सरकारकडे; मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय बोलणार?
नागपूरच्या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चार दिवस चर्चा झाली. मराठा आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीने आपला अहवाल सरकारला दिला आहे. आता त्यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली भूमिका विधानसभेत स्पष्ट करणार आहेत. मुख्यमंत्री आपली भूमिका मांडणार असल्याने साऱ्यांचं लक्ष मुख्यमंत्री काय भाष्य करणार याकडे आहे.
मुंबई, १९ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीने आपला अहवाल सरकारला दिला आहे. आता त्यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली भूमिका विधानसभेत स्पष्ट करणार आहेत. मात्र यापूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी सरसरकट आरक्षण देता येणार नाही, असं म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा लिखित दिलेलं आश्वासनाची आठवण करून देताय. उपोषण सोडवताना सरकारच्या शिष्टमंडळाने सरसकट आरक्षण देणार असं लिहून दिल्याचे जरांगे यांनी सांगितलं. ज्या लिखित आश्वासनाचा दाखल जरांगे देत आहेत आणि २४ तारखेनंतर चिठ्ठी सार्वजनिक करण्याचा इशाराही देताय. त्या चिठ्ठीत सरसकट आरक्षण देणार असं लिहिलंय, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. नागपूरच्या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चार दिवस चर्चा झाली. तर आता मुख्यमंत्री आपली भूमिका मांडणार असल्याने साऱ्यांचं लक्ष मुख्यमंत्री काय भाष्य करणार याकडे आहे.