Maratha Reservation : विठूरायाच्या शासकीय महापूजेला उपमुख्यमंत्री आले तर त्यांना काळं फासणार, कुणी दिला इशारा?

| Updated on: Nov 04, 2023 | 11:53 AM

येत्या 23 नोव्हेंबर रोजी पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशी आहे आणि या कार्तिकी एकादशीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा दरवर्षी होत असते. मात्र विठूरायाच्या या शासकीय महापूजेला उपमुख्यमंत्री यांनी येऊ नये, असा थेट इशारा मराठा सकल समाजाने दिलाय

सोलापूर, ४ नोव्हेंबर २०२३ | येत्या 23 नोव्हेंबर रोजी पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशी आहे आणि या कार्तिकी एकादशीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असते. मात्र विठूरायाच्या या शासकीय महापूजेला उपमुख्यमंत्री यांनी येऊ नये. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पंढरपुरातील सकल मराठा समाज आंदोलनावर ठाम असल्याचे मत सकल मराठा समाजाचे अध्यक्ष किरण घाडगे यांनी व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्र्यांचा हस्ते होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय महापूजेवर घातलेली बंदी कायम राहील. जर मराठा समाजाचा विरोध डावलून विठूरायाची शासकीय महापूजा करण्याचा प्रयत्न केल्यास उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळं फासणार असल्याचा इशाराही किरण घाडगे यांनी दिला आहे. बघा नेमकं काय म्हणाले ते…

Published on: Nov 04, 2023 11:51 AM
Maratha Reservation : शिंदे सरकारला दोन महिन्यांची मुदत दिल्यानं सरसकट आरक्षण मिळणार?
MSRTC : ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘लालपरी’ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री, किती झाली भाडेवाढ?