काय बोलावं ‘या’ सगळ्यावर? राज्यातील नाट्यगृहाच्या दुरावस्थेवर अभिनेते वैभव मांगले भडकले अन्…

| Updated on: May 16, 2023 | 2:26 PM

VIDEO | नाट्यगृहात डासांचा त्रास आणि प्रचंड उकाडा, राज्यातील नाट्यगृहांच्या दुरावस्थेच्या मुद्द्यावर आक्रमक, वैभव मांगलेंची 'ती' FB पोस्ट व्हायरल

मुंबई : नाटक संस्कृती कायम टिकून राहवी, म्हणून आजही प्रयत्न होतान दिसताय. मात्र राज्यातील नाट्यगृहांमधील एक वास्तव मराठी अभिनेता याच्या सोशल मीडिया पोस्टवरून समोर आले आहे. अनेकदा बरेच कलाकार वेळोवळी नाटक, नाट्यगृहांबाबत कोणताही मुद्दा असेल याबद्दल आवाज उठवतांना दिसतात. अशातच राज्यातील नाट्यगृहांच्या दुरावस्था आणि त्यांचं चित्र कथन करणारी ही पोस्ट मराठी अभिनेता वैभव मांगले याने लिहीली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमधून वैभव मांगले याने नाट्यगृहांमधील गैरसोयींवर भाष्य करत काय बोलावं ‘या’ सगळ्यावर? आणि याबद्दल दाद तरी कुणाकडे मागायची असा सवालही मांगले यांनी विचारला आहे. नाट्यगृहातील जास, बंद एसी, उकाडा यासंदर्भात वैभव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. ‘संज्या छाया’ या त्यांच्या नाटकादरम्यान त्यांना जो त्रास सहन करावा लागला, त्या अनुभवाबद्दल त्यांनी या पोस्टमध्ये लिहीले आहे. बघा काय आहे वैभव मांगलेची पोस्ट…

Published on: May 16, 2023 02:22 PM
लोकसभेसाठी मविआचा 16-16 फॉर्म्यला? आव्हाड म्हणतात…
देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर घटनेप्रकरणी कारवाई सुरू, काय आहे प्रकरण?