VIDEO : Chhagan Bhujbal | मराठीला अभिजात भाषेचा अद्याप का नाही? : छगन भुजबळ
जगभरात आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. देशभरातल्या मराठी भाषकांनी मराठीला अभिजात दर्जा द्यावा, असे साकडे केंद्र सरकारला घातले आहे. यावरून आता मंत्री छगन भुजबळांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जगभरात आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. देशभरातल्या मराठी भाषकांनी मराठीला अभिजात दर्जा द्यावा, असे साकडे केंद्र सरकारला घातले आहे. यावरून आता मंत्री छगन भुजबळांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भुजबळ नाशिकमध्ये बोलत होते. विशेष म्हणजे यापूर्वी मंत्री सुभाष देसाई यांनीही हाच आरोप केला होता. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीची 4 हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई याच्या उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आली आहेत.