मोर, शोर अन् वन्समोअर.. यमकसाठी मराठीचेच वाभाडे, ‘बालभारती’तील ‘ती’ कविता व्हायरल, युजर्स भडकले
जंगलात ठरली मैफल... या कवितेच्या शेवटच्या ओळीत “वन्समोअर, वन्समोअर झाला शोर!” असं लिहिण्यात आलं असून वन्समोअर आणि शोर हा इंग्रजी शब्द मराठी भाषेच्या पुस्तकातील कवितेत वापरल्यामुळे सोशल मीडियावर युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. यमकसाठी मराठीचेच काढले वाभाडे
बालभारतीच्या इयत्ता पहिल्या पुस्तकातील एक कविता चांगलीच चर्चेत आहे. या कवितेचे नाव आहे जंगलात ठरली मैफल… या कवितेच्या शेवटच्या ओळीत “वन्समोअर, वन्समोअर झाला शोर!” असं लिहिण्यात आलं असून वन्समोअर आणि शोर हा इंग्रजी शब्द मराठी भाषेच्या पुस्तकातील कवितेत वापरल्यामुळे सोशल मीडियावर युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाहीतर या कवितेवर साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून टीकाही केली जात आहे. सोशल मीडियावर सध्या बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकाची जोरदार चर्चा सुरू असून या पुस्तकामध्ये एका मराठीच कवितेत चक्क इंग्रजी शब्द वापरून यमक जुळवण्यासाठी शब्द मोडून तोडून वापरल्याची टीका केली जात आहे. मराठी भाषा शिकवताना मराठी शब्द का वापरत नाही, असे प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर विचारताना दिसताय..
अशी आहे ट्रोल होणारी कविता… जंगलात ठरली मैफल
“जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल,
तबल्यावर होती कोल्होबाची साथ वाघोबा म्हणाले, नाही ना बात ?
पेटी मी किती वाजवतो सुंदर हसत हसत म्हणाले साळींदर.
गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस !
मुंगीने लावला वरचा सां आवाज आवाज ओरडला ससा.
ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर झाला शोर !”