मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबद्दल सरकारकडून मोठ्या घोषणा, ‘मविआ’वर टीका अन् अजित पवार यांची कोंडी?
tv9 Special Report | मावळ ते मराठवाडयाचा दुष्काळ दूर व्हावा यासाठी आणलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजना, अजित पवार यांची कोंडी? सरकारच्या टीकेनंतर अजित पवार यांचा 'तो' बाईटही झाला व्हायरल
मुंबई, १७ सप्टेंबर २०२३ | मराठवाडयाचा दुष्काळ दूर व्हावा यासाठी वेगवेगळ्या धरणांमधून मराठवाड्यात पाईपलाईननं पाणीपुरवठ्याची योजना होती. या योजनेलाच मराठवाडा वॉटर ग्रीड योजना म्हटलं गेलं. काल सरकारनं त्याच योजनेबाबत मोठ्या घोषणा केल्या. मात्र घोषणांवेळी मविआवर टीका झाली आणि त्या टीकेनंतर मविआत असतानाचा अजित पवारांचा बाईटही व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. सरकार वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा करतंय, मात्र त्या घोषणांवेळी अजित पवारांची कोंडीही होत आहे. कारण घोषणेवळी याच योजना गेल्या सरकारनं बंद पाडल्याचा आरोप फडणवीस करतायत आणि दुसरीकडे गेल्या सरकारमध्ये मंत्री असलेले दोन्ही नेते शिंदे आणि अजित पवार त्यांच्या बाजूला बसलेले होतं. उदाहरणार्थ मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा मविआ सरकारनं खून पाडल्याचा आरोप फडणवीसांनी केला यावेळी अजित पवार त्यांच्या बाजूला बसले होते. मात्र हीच मराठवाडा वॉटर ग्रीड योजना एकदा तपासून पाहावी लागेल, असं मविआत असताना अजित पवार म्हणाले होते. बघा काय म्हणाले होते अजितदादा