मुंबईत आज तीन मोठे मोर्चे! पाहा, कुठून कुठे धडकणाकर आणि कुणाच्या काय आहेत मागण्या?

| Updated on: Jan 29, 2023 | 9:18 AM

मुंबईत आज कुठून कुठपर्यंत निघणार हे तीन मोठे मोर्चे...

मुंबईत आज तीन मोठे मोर्चे धडकणार आहेत. मुंबईत आज शिवाजी पार्क आणि चेंबूर अशा दोन ठिकाणी धर्मांतर विरोधी कायदा आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यात अस्तित्वात यावा, अशी मागणी घेऊन हिंदू जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे. हिंदू जनआक्रोश मोर्चा हा शिवाजी पार्क परिसरातून थेट लोअर परळ येथील कामगार कल्याण मंडळापर्यंत काढण्यात येणार आहे. यामध्ये हिंदू संघटनांचा लक्षणीय सहभाग असणार आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुंबईतील काही ठिकाणच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे मुंबईतील आझाद मैदानावर लिंगायत समाजाचा देखील महामोर्चा असणार आहे. लिंगायत समाजाला धर्म म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी लिंगायत समाजाकडून करण्यात येत आहे. आज ११ वाजता हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Published on: Jan 29, 2023 09:15 AM
उद्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदान, जाणून घ्या दिवसभरातील अपडेट
मुंबईतील ‘या’ भागात 2 दोन दिवस पाणी पुरवठी बंद, पाहा…