Corona Update | 18 वर्षाखालील मुलांना रेमडेसिवीर नको – केंद्र सरकारची नवी गाईडलाईन जारी
केंद्र सरकारने कोरोना महामारीदरम्यान 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी गाईडलाईन्स जारी केली आहे. यानुसार लहान मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir) अजिबात देऊ नये, तसंच 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे.
केंद्र सरकारने कोरोना महामारीदरम्यान 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी गाईडलाईन्स जारी केली आहे. यानुसार लहान मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir) अजिबात देऊ नये, तसंच 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन देऊच नये असं या गाईडलाईन्समध्ये निक्षूण सांगितलं आहे.
नव्या गाईडलाईन्सनुसार, 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावणं बंधनकारक नाही. तर 6-11 वर्षाच्या मुलांनी आई-वडिलांच्या देखरेखीखाली मास्क लावू शकतात. तसंच 12 वर्षावरील मुलं मास्क वापरु शकतात.