‘हनुमान चालीसा’वरून राणा दाम्पत्याचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार, म्हणाले…
VIDEO | नवनीत राणा आणि रवी रणा यांचा पुन्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण, अमरावतीमध्ये 6 एप्रिल रोजी सामूहिक हनुमान चालीसा पठण
अमरावती : गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरल्यानंतर चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या ६ एप्रिल रोजी अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्ताने अमरावतीसह राज्यात झळकलेल्या पोस्टर्सवर नवनीत राणा यांचा उल्लेख “हिंदू शेरणी” म्हणून करण्यात आला आहे, याच निमित्ताने नवनीत राणा आणि रवी रणा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला . उद्धव ठाकरे यांच्यात अहंकार आहे हनुमान चालीसा वाचली नाही म्हणून त्यांची सत्ता गेली, पक्ष गेला ,आता तरी उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसाच पठण करावं असं राणा दाम्पत्याने म्हटलं आहे तर ६ तारखेला होणाऱ्या सामूहिक हनुमान चालीसाचा आवाज मातोश्री पर्यंत व उद्धव ठाकरे यांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आमचा सामूहिक हनुमान चालीसा पठण आहे, असा दावा नवनीत राणा यांनी केला