Santosh Deshmukh : मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट, ‘त्या’ दोघांच्या भेटीचं CCTV फुटेज व्हायरल
मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटील यांच्यात झालेल्या भेटीचं सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले याची केज मधील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटील यांच्यात झालेल्या भेटीचं सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले याची केज मधील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले यांच्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आठ दिवस होत आलेत. या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला होता. त्याच अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे चार दिवसापूर्वीच निलंबन करण्यात आले आहे. पीएसआय राजेश पाटील आणि या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे केज शहरातील बसंत बिहार उडप्पी हॉटेलमध्ये भेटले होते. त्याचाच सीसीटिव्ही व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी व्हिडीओ कधीचा आहे, याबाबत कुणीही माहिती दिलेली नाही. टीव्ही9 मराठी सुद्धा या व्हिडीओची सत्यता आणि कालावधीबाबतची पुष्टी करत नाही.