मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील इमारतीला भीषण आग
मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. विठ्ठल निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आग लागलेल्या इमारतीमधून नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. विठ्ठल निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आग लागलेल्या इमारतीमधून नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. या आगीत आतापर्यंत कोणीही मृत अथवा जखमी झाले नाहीये. इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात येत आहे. आज दुपारी अंदाजे साडेबाराच्या सुमारास ही आग लागली असून, आगीने काही मिनिटांमध्येच रौद्र रूप धारण केले. इमारतीबाहेर आगीचे आणि धुराचे लोळ दिसत आहेत. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे.