बारसू रिफायनरी प्रकरणी मातोश्रीवर चर्चा, ठाकरे गटाची काय असणार भूमिका?
VIDEO | बारसू रिफायनरी सर्व्हेक्षणाचा मुद्दा तापला असताना मातोश्रीवर ठाकरे गटातील खासदारांची खलबतं, आंदोलकांबाबत काय असणार उद्धव ठाकरे यांची भूमिका?
मुंबई : कालपासून रत्नागिरीतील बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोपही केला. त्यानंतर मातोश्रीवर सर्व ठाकरे गटाच्या खासदारांची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले. रत्नागिरी येथील रिफायनरीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर बैठक होत असून बारसू येथील जमिनीचे सर्व्हेक्षण सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी विरोध सुरू केल्यानंतर प्रशासनाने काही महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामध्ये संजय राऊत यांनी सरकारला सामूहिक हत्याकांड करायचे आहे असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत, विनायक राऊत हे मातोश्रीवर दाखल झाले आणि त्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांची बारसू आंदोलन प्रकरणी ही आढावा होती. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात महाविकास आघाडीची अद्याप भूमिका जाहीर नसली तरी याबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.