यशवंत जाधव भीमपुत्र, कुणालाही घाबरणार नाहीत: महापौर किशोरी पेडणेकर

| Updated on: Feb 25, 2022 | 12:54 PM

स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) हे भीमपुत्रं आहेत. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्रं आहेत. ते कशाला कुणाला घाबरतील? ते संविधान मानणारे आहेत. कुणालाही घाबरणार नाहीत. ते असल्या धाडींना तर घाबरणारच नाही, असं महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी सांगितलं.

मुंबई: स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) हे भीमपुत्रं आहेत. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्रं आहेत. ते कशाला कुणाला घाबरतील? ते संविधान मानणारे आहेत. कुणालाही घाबरणार नाहीत. ते असल्या धाडींना तर घाबरणारच नाही, असं महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी सांगितलं. आयटीचे (income tax raid ) अधिकारी काही माहिती घेण्यासाठी आले आहेत. ही पाहणी आहे. त्याचा एवढा का बाऊ केला जात आहे? धाड पडली धाड पडली असं का सांगितलं जात आहे? आयटी फॉर्म भरताना काही त्रुटी राहिली असेल तर ते त्याची माहिती देतील. त्याचा बाऊ करण्याची गरज काय?, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. मी भराडी देवीच्या जत्रेला गेले होते. आता आले. आम्ही कशाला लपून राहू? असा सवालही त्यांनी केला.

Published on: Feb 25, 2022 12:54 PM
अंबड परिसरात चेन स्नॅचिंगची घटना, चोरांनी खेचली महिलेच्या गळ्यातील 6 तोळ्यांची चेन
2018च्या TET परीक्षेत अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेत पात्र केल्याचा गैरव्यवहार उघडकीस