Kishori Pednekar | 1ली ते 9वी वर्ग भरणार नाहीत मात्र ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार - किशोरी पेडणेकर

Kishori Pednekar | 1ली ते 9वी वर्ग भरणार नाहीत मात्र ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार – किशोरी पेडणेकर

| Updated on: Jan 03, 2022 | 7:31 PM

4 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत शाळा बंद असणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू असणार आहे त्यामुळे मुंबईकरांना माझं आवाहन आहे की कोरोनाच्या नियमांचे पालन करा, असे महापौर म्हणाल्या.

मुंबई : सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एकत्रितपणे पुन्हा एकदा ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, तो योग्य आहे. एका सर्वेक्षणांमधून अशी माहिती बाहेर आली आहे की 16 टक्के विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. 4 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत शाळा बंद असणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू असणार आहे त्यामुळे मुंबईकरांना माझं आवाहन आहे की कोरोनाच्या नियमांचे पालन करा, असे महापौर म्हणाल्या.