आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार… लवकरच अभ्यासक्रम सुरू होणार
मुंबई विद्यापीठ आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन आता नवीन खेळाडू घडवणार आहे. मुंबई विद्यापीठात आता लवकरच क्रिकेट विषयात पदवीधर होता येणार आहे. त्यासाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तरुणांना आता क्रिकेट विश्वात पाऊल ठेवण्यासाठी हा कोर्स अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार आहे. होय, ही बातमी खरी आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच मुंबई विद्यापीठाच्या सहाय्याने पदवीधर अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या अभ्यासक्रमात खेळपट्टी तयार करणे, व्हिडीओ विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, पंच यांसारख्या विविध विषय शिकवले जाणार असून त्यात तुम्हाला प्राविण्यही मिळवता येणार आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी याबाबतची माहिती दिली. येत्या जून- जुलैमध्ये हा अकॅडमिक प्रोग्राम सुरू होईल. एमर्जिंग प्लेअर्ससाठीचा हा बॅकिंग प्लॅन आहे, अशी माहिती अजिंक्य नाईक यांनी दिली आहे.
Published on: Feb 14, 2025 02:51 PM