संजय राऊत यांचा कोर्टाला अर्ज, पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी; काय आहे प्रकरण?
VIDEO | सुनावणीवेळी गैरहजर राहण्यासाठी संजय राऊत यांनी कोर्टाला विनंती अर्ज केला अन्...
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरूद्ध भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. याच प्रकरणी आज मुंबईतील शिवडी कोर्टात सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी गैरहजर राहण्यासाठी संजय राऊत यांनी कोर्टाला विनंती अर्ज केला होता. संजय राऊत यांचे दोन्ही अर्ज कोर्टाने मंजूर केले आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. मिरा भाईंदर शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामात आर्थिक घोटाळा झाला. यामध्ये किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचा हात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याविरोधात डॉ. मेधा सोमय्या संजय राऊत यांच्यावर मानहानी केल्याचा आरोप करून १०० कोटींचा दावा दाखल केला होता. त्याचीच आज सुनावणी झाली.
Published on: Apr 10, 2023 11:51 PM