Rajan Vichare यांनी ठाण्यातील टेंभीनाक्याच्या दहीहंडीविषयी केलं आक्षेपार्ह वक्तव्य! ‘गुन्हा दाखल करा’, कुणाची मागणी?
VIDEO | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावर ठाण्यातील टेंभीनाक्याच्या दहीहंडीविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप, राजन विचारे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांना कुणाचं निवेदन?
ठाणे, ७ सप्टेंबर २०२३ | ठाण्यात दहीहंडीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वादाला ठिणगी पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावर ठाण्यातील टेंभीनाक्याच्या दहीहंडीविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ठाणे नगर पोलिसांना निवेदन देण्यात आले यामध्ये राजन विचारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांनी केलेली आहे. राजन विचारे यांनी केलेला वक्तव्यावरून महिलांचा अपमान होत असल्याने त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तसेच अनेक वर्ष सोबत राहून ज्यांनी एवढी सर्व पद उपभोगली तेच लोक आता उलटे फिरत असल्याचा आरोप देखील यावेळी मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
Published on: Sep 07, 2023 07:34 AM