नांदेडमध्ये कुणाची वर्णी? ना चिखलीकर, ना रातोळीकर…भाजपकडून खतगावकर लोकसभा लढणार?

| Updated on: Mar 06, 2024 | 11:24 AM

नांदेडमध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांनी मीनल खातगावकरांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने जिल्ह्यात त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण आलं आहे. संभाजीनगरमध्ये मीनल खातगावकरांनी अमित शाह यांची भेट घेतली.

मुंबई, ६ मार्च २०२४ : नांदेड लोकसभेत विद्यमान खासदार चिखलीकरांसोबत रातोळीकर यांचं नावही चर्चेत होतं. मात्र आता मीनल खतगावकर यांचंही नाव चर्चेत आलं आहे. नांदेडमध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांनी मीनल खातगावकरांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने जिल्ह्यात त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण आलं आहे. संभाजीनगरमध्ये मीनल खातगावकरांनी अमित शाह यांची भेट घेतली. जर खातगावकरांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर नांदेडमधल्या दोन माजी काँग्रेसी नेत्यांना राज्यसभेनंतर लोकसभेचं तिकीट मिळणार आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना काहीच तासात राज्यसभेचे तिकीट भाजपने दिली. चव्हाणांनंतर मीनल खतगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची चर्चा आहे. मीनल खातगावकरांना तिकीट मिळाल्यास स्थानिकांच्या मते, भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांना मोठा धक्का असणार आहे. कारण अशोक चव्हाण जरी राज्यसभेत गेले तरी मीनल खतगावकर अशोक चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे नांदेड भाजपमध्ये चिखलीकरांच्या वर्चस्वाला चव्हाण पहिला धक्का देतील अशी चर्चा आहे. कोण आहेत मीनल खतगावकर?

Published on: Mar 06, 2024 11:23 AM
ऐतिहासिक समीकरणं अन् अनोखी लोकसभा, 8 महिन्यात 6 सर्व्हे… मात्र अंदाज अपना-अपना
नगरमध्ये क्लायमॅक्स सुरू, तुतारी वाजवा अन्… अमोल कोल्हे यांनी निलेश लंकेंना दिली खुली ऑफर