Special Report | उदय सामंत अन् शरद पवार यांच्यात भेटींवर भेट, फक्त बारसूसाठी ३ बैठका की आणखी काही?
VIDEO | मंत्री उदय सामंत आणि शरद पवार यांच्या भेटीमागे नेमकं कारण काय? बारसूसंदर्भात भेट की आणखी काही मुद्दा?
मुंबई : गेल्या १० दिवसांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तिसऱ्यांदा भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पण यांच्यात झालेल्या बैठका या रत्नागिरीतील बारसू रिफायनरी संदर्भात असल्याचे कारण दिले जात आहे. मात्र खरंच या भेटीमागे आणखी काय कारण आहे का? यावर स्वतः उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले, बारसू प्रकल्पावर चर्चा झाली, सुप्रीम कोर्टाच्या निकालावर कोणतीही चर्चा झाली नाही. उदय सामंत यांनी तासभर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी बंद दाराआड भेट घेतली. २१ एप्रिल रोजी उदय सामंत यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली. पुन्हा २६ एप्रिल रोजी वाय बी चव्हाण सेंटरवर उदय सामंत पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. तर आता काल १ मे रोजी पुन्हा सिल्व्हर ओकवर सामंत यांनी पवारांची भेट घेतली. या १० दिवसांतील २ भेटी फक्त बारसूसाठी होत्या की आणखी काय कारण होतं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…