‘ट्रायडंट’वर वंचित अन् ‘मविआ’मध्ये बैठक, प्रकाश आंबेडकर कोणत्या मुद्द्यावर करणार चर्चा?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडे ६ जागांसाठी प्रस्ताव मांडल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे. या जागांमध्ये अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी आणि अमरावतीचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
मुंबई, २ फेब्रुवारी २०२४ : मुंबईतील हॉटेल ‘ट्रायडंट’वर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात बैठक होत आहे. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडे ६ जागांसाठी प्रस्ताव मांडल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे. या जागांमध्ये अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी आणि अमरावतीचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित या मुद्द्यावर चर्चा करणार…महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागावाटपाचा अधिकृत फॉर्म्युला काय असणार? ६ जागांसाठी प्रस्ताव सादर करत अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी अमरावतीच्या जागांची वंचितकडून मागणी करण्यात येत आहे. यासह महाविकास आघाडीची ओबीसी आणि मराठा आरक्षणावर काय भूमिका असणार, मविआची बाजार समिती अॅक्ट आणि किमान आधारभूत किंमतीबाबत भूमिका काय? इंडिया आघाडीत वंचितच्या सहभागासाठी पवार, खर्गे, ठाकरेंच्या अधिकृत पत्राची मागणी या बैठकीत वंचिक करणार असल्याचेही सांगितले जात आहे.