‘मविआ’तील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-पवार यांच्यातील बैठक संपली, काय झाली चर्चा?
VIDEO | ठाकरे-पवार यांच्यातील बैठक सव्वा तासांनंतर संपली, कोण कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
मुंबई : राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांत विरोधी पक्षांमध्ये मतभेद असल्याचं चित्र पाहायला मिळत होते. अनेक मुद्द्यांवरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं समोर आलं. ‘मविआ’तील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-पवार यांच्यातील ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष या बैठकीकडे होतं. दरम्यान, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात सिल्व्हर ओक बंगल्यावर बैठक झाली. या चार नेत्यांमधील ही बैठक साधारण सव्वा तासांनंतर संपली आहे. आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यात मविआनं कबंर कसण्यास सुरूवात केली आहे. मात्र मविआतील वारंवार मतभेद समोर येत आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपसमोर आव्हान म्हणून उभं राहायचं असेल तर आपली वज्रमुठ घट्ट होण्याची गरज असल्याचं एकमत या बैठकीत झाल्याची माहिती समोर येत आहे.