१२ जूनला होणारी बैठक रद्द? नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून काय झाली चर्चा?
VIDEO | विरोधकांच्या समन्वयात गडबड; 12 तारखेला होणारी बैठकच रद्द? पाटण्याऐवजी आता कुठं होणार बैठक
मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याचे समोर आले आहे. विरोधीपक्षांच्या बैठकीबाबत दोघांमध्ये ही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, १२ जून रोजी होणारी पाटण्यातील बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. तर काही नेत्यांच्या पूर्वनियोजित कामांमुळे बैठक पुढे ढकलली असल्याची माहिती मिळत आहे. आता पाटण्यात नाही तर शिमला येथे नवी बैठक घेण्यास काँग्रेस आग्रही असल्याचं कळतंय. तर या बैठकीला इतर पदाधिकारी नकोत, असी भूमिका आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली आहे. ही सर्व चर्चा नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून झाल्याचे समोर येतंय.
Published on: Jun 06, 2023 01:21 PM