Special Report | अजित पवारांना भेटले उदयनराजे, मग राष्ट्रवादीत जाणार का? राजे म्हणतात, सर्व पक्षीय समभाव!

| Updated on: Feb 05, 2022 | 11:31 PM

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. साताऱ्यातील विकास कामांच्या अनुषंगाने ही भेट होती.

पुणे: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. साताऱ्यातील (satara) विकास कामांच्या अनुषंगाने ही भेट होती. या भेटीत अजित पवार यांनी उदयनराजे यांनी मांडलेले साताऱ्यातील अनेक प्रश्नांचा फोनाफोनी करून तिथल्या तिथे निकालही लावला. मात्र, बऱ्याच दिवसानंतर दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याने या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या भेटीनंतर उदयनराजे भोसले काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उदयनराजे मीडियासमोर येताच तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर उदयनराजे यांनी सर्वपक्षीय समभाव अशी सूचक प्रतिक्रिया देऊन सर्वांना बुचकळ्यात पाडलं. त्यामुळे उदयनराजे खरंच राष्ट्रवादीत जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.

वाहनाची काच फोडून चोरीचा प्रयत्न, पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले
Special Report | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची फटकेबाजी!