Priyanka Chaturvedi यांनी थेटच म्हटलं, ‘आमचं सरकार तर येऊ द्या मग बघा…’

| Updated on: Aug 31, 2023 | 12:01 AM

VIDEO | विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक उद्या मुंबईत होणार असून यापूर्वीच उद्धव ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काय केला विश्वास व्यक्त, बघा व्हिडीओ

मुंबई, 30 ऑगस्ट 2023 | विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक उद्या मुंबईत होणार आहे. त्याआधीच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या बैठकीतून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट इशारा दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी जनता इंडियासोबत असल्याचे म्हटले आहे. तर जनतेने आमची सरकार बनवावं म्हणजे लोक सुटकेचा निश्वास टाकतील. महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. युवकांना चांगली संधी आहे. काश्मीरमध्ये हिंदूंच्या समस्या आहेत. उत्तर प्रदेशात मुसलमानांनच्या समस्या आहेत. ही फार मोठी समस्या असल्याचंही प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हंटलं.

Published on: Aug 31, 2023 12:01 AM
संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांना कोणी दिली 100 कोटींची ऑफर? काय आहे प्रकरण?
‘Sharad Pawar यांनी राजकारणातून रिटायर व्हावं’, कुणी केलं मोठं वक्तव्य अन् दिला सल्ला?