Sharad Pawar Resigned | निवृत्तीच्या घोषणेनंतर ‘सिल्व्हर ओक’वर बैठकांचं सत्र, कोण घेणार शरद पवार यांची भेट?

| Updated on: May 03, 2023 | 11:31 AM

VIDEO | शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर NCP च्या बड्या नेत्यांकडून पवारांची मनधरणी, पण...

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल आपला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला अजित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील हे देखील उपस्थित राहणार आहे. तर यांच्यासह राजेंद्र शिंगणे, प्राजक्त तनपुरे, उमेश पाटील हे देखील शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओक या त्यांच्या निवास्थानी दाखल होणार आहे. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीचं सत्र आज पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वी शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर ते वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्या भेटीगाठी कायम आहे. तर आज शरद पवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. यावेळी शरद पवार यांच्या सोबत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या आज सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये भेटगाठीचा कार्यक्रम ठरलेला आहे.

Published on: May 03, 2023 11:31 AM
Sharad Pawar Resigns | शरद पवार निवृत्तीवर ठाम, मात्र दिनक्रम कायम अन् भेटीगाठी सुरूच
कलयुगातील शकुनीमामा; भाजप नेत्याचा राऊतांवर पलटवार; कोणी केली टीका?