Mumbai Railway Mega Block | मुंबईकरांनो महत्त्वाची बातमी, ‘या’ मार्गावर ११ दिवसांचा ब्लॉक; २,५२५ लोकल रद्द

| Updated on: Oct 25, 2023 | 2:45 PM

VIDEO | मुंबईकरांनो... मुंबई लोकल रेल्वेने प्रवास करताय? मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील खार ते गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान ११ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल - बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे.

मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३ | मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील खार ते गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान ११ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल – बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका उभारण्याचे काम रेल्वेकडून सुरू आहे. या कामांतर्गत खार ते गोरेगाव रेल्वेमार्गावर सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या कामानिमित्त हा ११ दिवसांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉग येत्या २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत असा साधारण ११ दिवस घेण्यात येणार आहे. सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या या कामानिमित्त २ हजार ५२५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई सेंट्रल – बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका उभारण्याचे काम रखडले होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची देखील गैरसोय होत होती. दरम्यान ७ ऑक्टोबरपासूनच या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी वेगवेगळे ब्लॉक घेऊन याचे पायाभूत कामे करण्यात येत आहे. त्यामुळे दररोज या मार्गावर धावणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील १०० ते दीडशे फेऱ्या रद्द करण्यात येत आहे.

Published on: Oct 25, 2023 02:45 PM
Sanjay Raut : भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत, एकनाथ शिंदे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊत यांनी घेरलं
एकनाथ शिंदे यांचा मेळावा म्हणजे भाजप आणि बिर्याणीचा मेळावा, ठाकरे गटाची खोचक टीका