Mega Block | रेल्वेने प्रवास करताय? पनवेल ते बेलापूरदरम्यान 38 तासांचा मेगाब्लॉक, कोणत्या वेळात लोकल बंद?
VIDEO | पनवेल ते बेलापूर या रेल्वे मार्गादरम्यान 38 तासांचा मेगाब्लॉक करण्यात आला आहे. काल रात्री 11 वाजल्यापासून हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक सुरु झाला असून हा मेगाब्लॉक शनिवारी 11 पासून ते सोमवारी 1 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार आहे.
पनेवल, १ ऑक्टोबर २०२३ | हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी बातमी आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी रेल्वेने महत्वाची सूचना दिली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील वेळापत्रकामधे बदल करण्यात आला आहे. पनवेल ते बेलापूर या रेल्वे मार्गादरम्यान 38 तासांचा मेगाब्लॉक करण्यात आला आहे. काल रात्री 11 वाजल्यापासून हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक सुरु झाला असून हा मेगाब्लॉक शनिवारी 11 पासून ते सोमवारी 1 वाजेपर्यंत असणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान, पनवेल ते बेलापूर मार्गावर एकही लोकल धावणार नाही, त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे. अप आणि डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. नव्या रेल्वे मार्गिकेचं काम सुरु असल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक शनिवारी 11 पासून ते सोमवारी 1 वाजेपर्यंत सेवा बंद असणार आहे.