Mumbai Railway Megablock : लोकलने प्रवास करताय? वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा.. कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?

| Updated on: Aug 04, 2024 | 12:35 PM

मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. इतर कोणत्या रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक जाणून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून...

Follow us on

मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर वडाळा रोड आणि मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर आज सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत ब्लॉक आहे. ब्लॉक कालावधीत वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग बंद राहील. सीएसएमटी येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.५४ वाजेपर्यंत वाशी-बेलापूर-पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी-बेलापूर-पनवेल येथून सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ वाजेपर्यंत सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वांद्रे-गोरेगाव सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वांद्रे / गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर लाईन आणि मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.