Pune | कोरोना निर्बंधाविरोधात पुण्यातील व्यापारी आक्रमक, मंगळवारपासून दुकानं उघडण्याचा इशारा
दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आलीय. सरकारने यासंदर्भात सकारात्मक न निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय.
पुणे : कोरोना निर्बंधांच्या विरोधात पुण्यातील व्यापारी आक्रमक झाले आहेत, सोमवारपर्यंत निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाली नाही तर मंगळवारपासून दुकानं खुली करू असा इशारा पुण्यातील व्यापाऱ्यांनी दिलाय. तसेच दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आलीय. सरकारने यासंदर्भात सकारात्मक न निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय.