फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, मार्क झुकेरबर्ग म्हणाला…
भारतातील सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मिडीया अॅप्लिकेशन पैकी फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये मोठा बदल होणार आहे. मेटा कंपनीकडून थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम आता बंद करण्यात येणार आहे.
तुम्ही सोशल मीडिया युजर असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण भारतातील सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मिडीया अॅप्लिकेशन पैकी फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये मोठा बदल होणार आहे. मेटा कंपनीकडून थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम आता बंद करण्यात येणार आहे. तर त्याजागी आता मेटा कंपनीकडून कम्युनिटी नोट्स नावाचा नवीन प्रोगाम सुरू होणार आहे. दरम्यान, मेटाकडून सुरू करण्यात येणाऱ्या या नव्या प्रोग्रामद्वारे युजर्स स्वतः आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकणार आहेत. हा नवा प्रोग्राम इलॉन मस्कच्या ट्वीटरप्रमाणे काम करताना दिसणार आहे. या बदलाची सुरूवात अमेरिकेतून करण्यात येणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मालकी असलेल्या मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग याने मंगळवारी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत घोषणा केली.
Published on: Jan 08, 2025 01:49 PM