Mumbai Weather : ढासळत्या वातारणामुळे हवामान खात्याकडून मुंबईत येलो अलर्ट, येत्या २४ तासांत ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट तर येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता
मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३ | अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर मुंबईमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. इतकंच नाही तर २४ तासांसाठी मुंबईत यलो अलर्ट देखील जारी केला आहे. त्यासोबत काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. काल संध्याकाळी ५ वाजेपासून मुंबईत काही भागात पावसाला सुरूवात झाली होती. तर राज्यातही काही ठिकाणी पाऊसाला सुरूवात झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना या अचानक आलेल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबईत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी केला आहे. तर येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.