Special Report | आरोग्य भरतीच्या परीक्षेनंतर म्हाडातही पेपरफुटी
आज राज्यभरात म्हाडा भरतीचा पेपर होणार होता. दरम्यान, पेपर फुटण्या संदर्भातील तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत पोहचल्या. त्यानंतर आव्हाडांनी रात्री ट्विट करून गृहमंत्र्यांनी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.
पुणे : आरोग्य भरती परीक्षेचा खेळ खंडोबा सुरु असतानाच म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यावर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय. तर विरोधीपक्ष असलेल्या भाजपने या सगळ्या प्रकरणात राज्य सरकारवर टिकेची झोड उठवलीय. याप्रकरणी पुणे पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून या सगळ्यांमध्ये क्लासचालकांचं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. आज राज्यभरात म्हाडा भरतीचा पेपर होणार होता. दरम्यान, पेपर फुटण्या संदर्भातील तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत पोहचल्या. त्यानंतर आव्हाडांनी रात्री ट्विट करून गृहमंत्र्यांनी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. 565 जागांसाठी ही परीक्षा होणार होती.