Mhada Lottery | म्हाडाच्या 9 हजार घरांची दसऱ्याच्या मुहुर्तावर सोडत
म्हाडाच्या कोकण मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे नऊ हजार घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती
दोन वर्षांपासून मुंबईतील म्हाडाच्या घरांची सोडत रखडली असली तरी आता शहराजवळ परवडणाऱ्या किमतीत हक्काचे घर घेण्याची संधी मुंबई-ठाणेकरांना मिळणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे नऊ हजार घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. 2018 मध्ये 9018 घरांसाठी सोडत निघाली होती.